मुंबईत आजही दमदार पाऊस सुरु झालाय. विशेष म्हणजे काल मोठा पाऊस होऊनही ज्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं नाही, तिथं आज मात्र पाणी साचलंय. याशिवाय माटुंग्यातही पावसाचं पाणी साचलंय. दादरच्या पारसी कॉलनीत आज पाणी साचलंय. मुंबईत आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय .या पार्श्वभूमीवर आज सकाळीच झालेल्या दमदार पावसानं दादर-हिंदमाता, माटुंगा परिसरात पाणी साचलंय.