राज्यातल्या सत्तासंघर्षात सर्वांच्याच कायमच्या लक्षात राहिलेलं नाव म्हणजे शहाजी बापू पाटील. विधानसभेत बहुमत सिद्ध करून शिंदे सरकारवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार आपल्या मतदारसंघात परतत आहेत. शहाजी बापू पाटीलही आज सांगोल्यात परतले आहेत. शहाजी बापूंचं सांगोल्यात जंगी स्वागत करण्यात आलं.... कार्यकर्त्यंनी ढोल ताश्यांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं स्वागत केलं..