चित्रपट आणि वाद यांचं एक जुनं नातं आहे. कधी इतिहासाशी छेडछाड तर कधी लोकांच्या धार्मिक भावना दुखावणं अशा कारणांमुळे अनेक चित्रपट वादात सापडले आहेत. चित्रपट निर्माती लीना मनीमेकलाईची एक डॉक्युमेंटरी फिल्म अशाच एका वादात सापडली आहे. २ जुलैला तिच्या काली या फिल्मचं पोस्टर रिलीज झालं आणि त्यावरुन एका नव्या वादाला तोंड फुटलं.