महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह इतर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.