सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीत पोहोचलेत. ते कुणाच्या गाठीभेटी घेणार आणि सत्तासंघर्षात भाजप कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे गुवाहाटीत पोहोचल्यानंतर
सहा दिवसांनी एकनाथ शिंदे आज कॅमेऱ्यासमोर आले आणि माध्यमांसमोर भूमिका मांडली. शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं द्या, असं आव्हान त्यांनी दिलं. दरम्यान, गुवाहाटीत शिंदे समर्थकांची बैठक सुरू आहे आणि त्यात शिंदे गटाची पुढची रणनीती ठरणार आहे.