शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पुण्यातील कोथरूड, बालगंधर्व चौक आणि येरवडा या भागात शिवसैनिकांनी आंदोलन केले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. येरवडा येथील माजी नगरसेवक संजय भोसले देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.