शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पुण्यातील कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोला जोडे मारत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.