मुंबई: बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे आव्हान आता मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं असून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपण ज्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही. शिंदेंच्या या बंडामागे भाजप असल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत जे भाजपसोबत गेलेत ते संपलेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आपल्यासोबत आता कोणीही नाही असं समजून काम करा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.