एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतलं वातावरण दोन दिवसांत कसं बदललं हे मुंबईतले दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर यांच्या भूमिकेवरून दिसून येतंय. बंडानंतर एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांविरोधात मंगळवारी आंदोलन करणारे सदा सरवणकर आज गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले..... उद्धवसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देणाऱ्या सरवणकर यांनी अवघ्या काही तासांत बाजू बदलून शिंदे गटाची वाट धरली...... त्यामुळे राजकारण बेभरवशाचं असतं म्हणतात त्याचा प्रत्यय या निमित्तानं आला.....