Bharat Bandh: अग्निपथ योजनेला तीव्र विरोध, सोमवारी भारत बंदची हाक,अनेक शाळा बंद

2022-08-18 2

केंद्र सरकारच्या अग्निपथ लष्करी भरती योजनेला अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध केला जात आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले असून काही संघटनांनी 20 जून रोजी भारत बंदची  हाक दिली आहे.केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. विरोधी पक्षांनीही अग्निपथ योजनेला विरोध केला आहे.