जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस चे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांना जोरदार झटका बसला, या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांचा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांनी 54 मतांनी पराभव केला, अतिशय अतीतटीच्या या लढती मध्ये अर्जुन खोतकर प्रणित जयभवानी शेतकरी विकास पॅनलचे 13 ही उमेदवार निवडून आले असून यावेळी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार या निवडणुकीत पराभूत झालेत..