विधान परिषद किंवा राज्यसभेसाठी आपण इच्छुक नव्हतो, असं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज स्पष्ट केलं. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून विनोद तावडे यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत होतं. त्यांना पक्षानं डावलल्याची चर्चा होती. पण तावडे यांनी आपण या निवडणुकीत इच्छुक नव्हतो असं सांगत या चर्चेवर पडदा टाकला.