मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा राजभवन येथून वर्षा निवासस्थानी जात असताना एका व्यक्तीने सुरक्षा कवच भेदून थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा तात्काळ थांबवावा लागला. या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कार समोरच त्याची कार घुसवल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.