मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासाठी राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राज ठाकरेंच्या पायाचं दुखणं वाढल्यानं शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याआधीही शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे रुग्णालयात दाखल झाले होते. पण तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स आढळल्यानं शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.