कोरोना लसीकरणातील दुसरा डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घेण्यासाठी ९ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती... मात्र आता ही प्रतीक्षा कमी होणार आहे... कारण बूस्टर डोस साठी सहा महिन्यांचं अंतर ठेवावं अशी शिफारस राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहानं म्हणजेच एनटीएजीआयनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला केलेय. त्यामुळे आगामी काळात केंद्र सरकार याबाबत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे...