मुंबईमधल्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा डिलाइल पूल अर्थात लोअर परळ पुलाची गर्डर उभारणी मंगळवार पासून सुरू करण्यात आली आहे. एक हजार टनापेक्षा जास्त वजन आणि ९० मीटर लांब असा हा गर्डर आहे. सलग चार दिवस या गर्डरचं काम सुरु आहे. हा गर्डर छोट्या-छोट्या भागांमध्ये बनवण्यात आला आणि त्याची जोडणी करण्यात आली.