देहूत Narendra Modi यांच्यासमोर बोलू न देण्याच्या वादावर Ajit Pawar म्हणतात-

2022-06-16 4,170

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण मंगळवारी झालं. यावेळी फडणवीसांना भाषण करण्याची संधी दिली पण उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू दिलं नाही असा आरोप राष्ट्रवादीनं केला. पण यावेळी खुद्द पंतप्रधान मोदींनी स्वत: अजित पवारांना भाषण करण्यासंबंधीचे हातवारे केले. पण अजितदादांचं भाषण झालं नाही. यावरुन राष्ट्रवादीकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. याच वादावर आज बारामतीतील कार्यक्रमात विचारलं असता त्यांनी देहूतला कार्यक्रम सुंदर झाल्याची प्रतिक्रिया दिली.
#ajitpawar #narendramodi #sainttukaram #shilamandir #devendrafadnavis #ajitpawarspeaks #sharadpawar #ncp #narendramodiindehu #narendramodibjp

Videos similaires