Heavy Rain:आसाममध्ये मुसळधार पाऊस, गुवाहाटीला आला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2022-08-18 7

गुवाहाटीच्या अनेक भागात भूस्खलन झाले. संततधार पावसामुळे आसाममधील शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. गुवाहाटीतील बोरागाव येथे 14 जून रोजी भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.