देहू येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमादरम्यान झालेल्या सभेत व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी दिली नाही. त्या घटनेनंतर राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादीकडून मुंबई-पुण्यात आंदोलन करण्यात आले.
#NCP #BJP #AjitPawar #NarendraModi #dehu