Ajit Pawar यांना भाषण न करू दिल्याबद्दल राष्ट्रवादी आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांना काय वाटतं?

2022-06-15 1,318

देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्या सभेदरम्यान पंतप्रधान मोदींच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्यामुळे महाराष्ट्रात राजकारण तापलंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपाचा निषेध केला आहे. अजित पवारांना भाषण करू न देणं हा भाजपाचा प्रिप्लॅन असल्याचा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. तर, अजित पवारांच्या भाषणापेक्षा मोदी देहूत आले, हे महत्वाचं असल्याचं भाजपाचे माजी मंत्री संजय भेगडे म्हणाले.

#AjitPawar #dehu #tukarammaharaj #palkhisohola #NarendraModi