पंढरपूर विठोबा आषाढी वारीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी येत्या 20 जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 21 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.महत्त्वाचे म्हणजे या वर्षी तिथी-वाढ आहे. त्यामुळे संत तुकोबांच्या पालखीचा मुक्काम इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. तिथीवाढीमुळे यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती पालखी सोहळा समितीने दिली आहे.