Fuel Shortage: देशात पेट्रोलचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे पंपावर नागरिकांनी केली गर्दी, स्थानिक पेट्रोल पंपानी साठा पुरेसा असल्याची दिली माहिती

2022-08-18 3

देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवांमुळे राजस्थान, उत्तराखंड आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 14 जून रोजी संध्याकाळी, इंडियन ऑइलने एक विधान जारी केले की, “प्रिय ग्राहकांनो, आमच्या रिटेल आउटलेटवर उत्पादनाची उपलब्धता सामान्य आहे” भारत पेट्रोलियम म्हणाले, \"आम्ही प्रत्येकाला खात्री देतो की आमच्या नेटवर्कवर, आमच्या सर्व इंधन केंद्रांवर पुरेशा प्रमाणात उत्पादन उपलब्ध आहे\"