सैन्य भरतीशी निगडित 'अग्निपथ' योजनेची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा केलीय. या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्य भरतीची संधी मिळणार आहे. ही सैन्यभरती चार वर्षांसाठी असेल. या अंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर असं संबोधलं जाणार आहे. ४ वर्षांच्या सेवेअंतर्गत अग्निवीरांना चांगलं वेतन आणि सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. हे अग्निवीर चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतील. चार वर्षांनंतर या योजनेंतर्गत भरती झालेल्या ८० टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याचं पुन्हा संधी मिळणार आहे.