Rahul Gandhi ची सुमारे साडेआठ तास चौकशी, आज पुन्हा राहावं लागेल चौकशीसाठी हजर

2022-08-18 1

१३ जून रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी ईडीने सुमारे 9 तास चौकशी केली. ईडीने त्यांना चौकशीसाठी पुन्हा मंगळवारी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, काल काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवसभर रस्त्यावर निषेध मोर्चा काढून ईडी आणि भाजपच्या विरोधात निदर्शने केली.हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. सोनिया गांधी यांना कोविड-19 ची लागण झाल्यामुळे त्यांनी आणखी वेळ मागितला आहे.