सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या संतोष जाधव याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातच्या कच्छ मधून संतोष जाधवला त्याच्या एका साथीदारासह अटक करण्यात आलीय. हा संतोष जाधव लॉरेन्स बिष्णोई टोळीसाठी काम करत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. इतकच नाही तर ही बिश्नोई गँग सोशल मीडियाचा वापर करुन आपलं जाळं विस्तारत असल्याचं आणि तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचं समोर आलंय.