पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर रात्रीपासून वज्रलेपन प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. उर्वरित लेपन प्रक्रिया सकाळी ११ पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. या वज्रलेपन प्रक्रियेची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं एबीपी माझाच्या हाती आलेली आहेत.... विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोर आलं. त्यामुळे ही लेपन प्रक्रिया करण्यात येतेय. लेपन प्रक्रियेमुळे भक्तांना आज दिवसभर रुक्मिणी मातेचं दुरुन दर्शन घ्यावं लागणार आहे.