दोन दिवसांपूर्वी सीमोल्लंघन करत राज्यात दाखल झालेल्या पावसानं आता हळूहळू राज्य व्यापायला सुरुवात केलेय. मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यानं पुढील ४८ तासात मान्सून राज्यातल्या अनेक भागात आगेकूच करणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे..