पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आनंदलाय... पाऊस लांबल्यानं शेतीची कामं खोळंबली होती.. मात्र आता मान्सून बरसायला लागल्यानं शेतीच्या कामांनीही वेग घेतलाय. काल एकादशी असल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी काल नांगर हातात घेतले नव्हते.. मात्र आजपासून शेतीची कामं वेग घेणार आहेत... मात्र मान्सूननं अजून राज्य पूर्णपणे व्यापलं नाहीये त्यामुळे दुबार पेरणीची नामुष्की टाळण्यासाठी घाई करू नका असा सल्ला शेती तज्ज्ञांनी दिलाय.