राज्यसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आहे. देवेंद्र फडणवीसांनी या विजयाचे श्रेय भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना दिलंय. आमदार लक्ष्मण जगताप हे दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. तरी देखील पक्षनिष्ठा कायम राखत त्यांनी रुग्णवाहिकेतून मुंबई गाठली. तिथं देवेंद्र फडणवीस यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत मनोधैर्य वाढवत कौतुक केलं. यामुळं जगताप कुटुंबीय भारावून गेले असून जगताप हे पक्षनिष्ठेमुळेच मुंबईपर्यंत पोहचू शकले, ते लढवय्ये आहेत, असं त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी म्हटलंय.