खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर भीम आर्मीने संविधान प्रास्ताविकेचं वाचन केलंय. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा राणा दाम्पत्याला विकास कामासाठी जाग यावी यासाठी हे वाचन केल्याचं भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी सांगितलं आहे.