भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाचा हंगामी कर्णधार लोकेश राहुलला दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघाच्या कर्णधारपदाची सूत्रं यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती सोपवण्यात आली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. दिल्लीतल्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याच्या पूर्वसंध्येला लोकेश राहुल आणि कुलदीप यादवला दुखापतीमुळं या मालिकेतूनच माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या माघारीनं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.