मनसेने मराठी भाषेचा मुद्दा उचलल्यानंतर त्यावरुन मुंबईत बरच काही घडलं. मराठी भाषा हा एक राजकीय मुद्दा देखील बनला. त्याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा येतेय. पण यामागे मनसे नसून भारतीय जनता पक्ष दिसतोय. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मराठी भाषेवरुन उत्तर प्रदेश सरकारकडे एक वेगळीच मागणी केलीये.