महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासत रहावे, असे आवाहन करत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
‘या’ वेबसाईटवर लॉग इन करून निकाल पाहू शकतात:
msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
#varshagaikwad #hscresult #maharashtra