Norovirus in Kerala: केरळमध्ये नोरोव्हायरसच्या 2 रुग्णांची नोंद, जाणून घ्या किती घातक

2022-08-18 1

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातचं आता नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम मधील दोन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले. उलट्या, जुलाब आणि ताप ही या आजाराची लक्षणे आहेत. नोरोव्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे असून तो दूषित अन्न, पाण्याद्वारे पसरतो.