रुग्णांची संख्या वाढतेय आणि त्या पार्श्वभूमीवर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक रुग्णवाढ असलेल्या पाच जिल्ह्यांबाबत खबरदारी घेण्यावर चर्चा झाली. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढतेय आणि त्यामुळे या पाच जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं बैठकीत चर्चा झाली.