गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात काही ठरावीक विषय, काही ठरावीक मुद्दे समोर आलेत, ज्यामुळे, वाद, टीका, एकमेकांना प्रत्युत्तर या सगळ्या गोष्टी सातत्याने आपण पाहतोय. पण याच प्रवाहात एक नवीन चेहरा, चेहरा तसा नवीन नाही पण नवीन चर्चांना वाट मोकळी करुन देणारं नाव पुढे आलंय. नाव म्हणण्यापेक्षा आपण आडनाव म्हणूयात. कारण या आडनावाचीच चर्चा राजकारणात सर्वदूर सुरुय. सिनेसृष्टीतून लोकप्रिय झालेला चेहरा जेव्हा राजकारणात सक्रीय होतो तेव्हा आपसूकच त्यांनी केलेली वक्तव्य काळजीपूर्वक ऐकली जातात. हे नाव आहे मराठी अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेल्या महिला नेत्याचं. ज्याच्ंया पक्षप्रवेशापासून ते आडनावापर्यंत सगळ्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील असं हे नाव, दीपाली भोसले उर्फ दीपाली सय्यद.