'माझ्या पराभवाचं मी सोनं केलं'; Pankaja Munde पुन्हा नाराज?

2022-06-03 47

आज गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 8 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. तर आता पर्यंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अशाच मंचवरून आपली नाराजी व्यक्त केलीये. तर 2019 च्या निवडणुकाच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून डावललं जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. तसंच पंकजा यांनी सुद्धा त्याबाबत वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली. अशातच गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंकजा म्हणाल्या की 'दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत.' माझ्या पराभवाचं मी सोनं केलं, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या पुन्हा एकदा त्यांनी आपली नाराजी बोलावून दाखवली.

#PankajaMunde #BJP #GopinathMunde #GopinathGad #Beed #DevendraFadnavis #MemorialPark #Pangari #Elections #VidhanParishad #MVA #MahaVikasAghadi #MarathiNews #Maharashtra

Videos similaires