मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीत म्हाडाच्या तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. त्यापैकी एक हजार ७७६ घरं पहाडी गोरेगावमध्ये असणार आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. मुंबईतल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळं या शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांना धूसर वाटतं. पण म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होऊ शकतं.