Maharashtra Mask: राज्यात पुन्हा मास्कसक्ती? ABP Majha

2022-06-02 12

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्स यांच्यात थोड्याच वेळात बैठक सुरु होणार आहे. राज्यात पुन्हा मास्कसक्ती करायची का? याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कसक्तीबाबतचे संकेत दिले आहेत.