प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ यांचे निधन झाले आहे. कोलकाता येथील कॉन्सर्टनंतर अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ जवळच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या प्राथमिक माहतीनुसार, केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले आहे की, गायक केके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला, असे सूत्रांनी सांगितले.