'पंचायत' वेबसीरिजचा दुसरा सिझन नुकताच अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. पहिल्या सिझनप्रमाणेच दुसऱ्या सिझननेही प्रेक्षकांची मनं जिंकलीत. शिवाय या सिझनमध्येही सचिवजी-रिंकीची लव्हस्टोरी आणि गावातल्या राजकारणातील काही प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. त्यामुळे या सीरिजचा तिसरा भाग येणार की नाही, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यातल्याच काही प्रश्नांची उत्तरं सीरिजचे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली. पाहा त्यांची खास मुलाखत....