हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या पोषक वातावरण निर्माण झाल्याने येत्या काही दिवसांत मान्सून तळकोकणात आणि पुढे संपूर्ण राज्यात हजेरी लावणार आहे. दरम्यान, आज भारतीय हवामान खात्याने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे. पूर्वीच्या तुलनेत जास्त पावसाची शक्यता आहे आणि 103% पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.