दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती कामे हाती घेतली जातात. पावसाळ्यात पाणी भरतं आणि त्यामुळे वाहन चालकाचा अपघात होऊ नये या उद्देशाने ठीक ठिकाणी खड्डे भरण्याचे काम महानगरपालिका करते. मात्र काही ठिकाणी निधी मिळत नसल्याने अनेक रस्त्यावर पावसाळ्यात मोठ मोठे खड्डे पडून अनेक अपघात घडतात. पण या रस्त्यांसाठी कोणी निधी दिला असा प्रश्न सर्व उपस्थित होत असताना कल्याण डोंबिवलीमध्ये माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महानगरपालिकेला विविध टेलिकॉम कंपन्यांकडून 'खड्डा फी'ची आठवण देत त्याचा पाठपुरावा करत त्या खड्डा फीतून रस्ता बनवला आहे.
#KDMC #KalyanDombivali #MohanUgale #FormerCorporator #Roads #Pits #RoadDamage #Potholes #Monsoon #BMC #Thane #Mumbai #Maharashtra #HWNews