राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील दावेदारीवरुन सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. सर्वात आधी संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून या सहाव्या जागेवर दावा सांगितला होता. पण, शिवसेना किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायला तयार नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे संभाजीराजेंची मात्र आता कोंडी झालीये. पण अशातच आता या खेळात एक नवा ट्विस्ट येऊ शकतो कारण आता यात भाजप आणि देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
#SambhajiRaje #DevendaFadnavis #DhananjayMahadik #SambhajirajeChhatrapati #RajyaSabhaElection #Shivsena