बुलढाणा: ठिकठिकाणी उभारलेल्या पुतळ्यावरून अजित पवार संतापले

2022-05-21 2,895

उपमुख्यमंत्री अजित पवार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी शहरातील दोन ठिकाणी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले. तसेच राजवाड्यात देखील पुन्हा एक पुतळा असल्याने अजित पवार यांना पुन्हा हार अर्पण करण्यासाठी विनंती केली असता, त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष नाझिर काजी आणि पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना "किती हे पुतळे" असा सवाल केला, आणि ठीक ठिकाणी उभारलेल्या पुतळ्यावरून त्यांनी एक प्रकारे स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.