शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आजपासून प्रदर्शित. शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आनंद दिघेंबद्दल अढळ स्थान याचीच प्रचिती आज डोंबिवलीत पाहायला मिळाली. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात दिघेंचे भव्य होर्डिंग उभारण्यात आले डोंबिवलीतील शिवसैनिकांनी होर्डिंगवर केली पुष्पवृष्टी शिवसेना शहर शाखा व शहर प्रमुख राजेश मोरेंडून शिवसैनिकांसाठी विशेष शोंचे आयोजन चित्रपट पाहण्यासाठी डोंबिवली तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण भागातील शिवसैनिकांची गर्दी . चित्रपट सुरू झाल्यानंतर 'आनंद दिघे अमर रहे'च्या घोषणांनी संपूर्ण चित्रपटगृह दणाणून गेले