सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही आले नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही', असे म्हणत महाविकासाघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सत्तेच्या ताम्रपटाबद्दल उल्लेख होता. यावरुन प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार बोलत होते.