सोलापूर: तरुणांची कौतुकास्पद कामगिरी; वेळीच मदत केल्याने वाचला रुग्णाचा जीव

2022-05-12 121

सोलापुरात माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना समोर आलीय. एका अत्यावस्थ रुग्णाला घेऊन येणारी रुग्णवाहिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बंद पडली. यानंतर रुग्णवाहिकेतील नातेवाइकांनी रडण्यास सुरुवात केली. हे कळताच तिथे थांबलेल्या तरुणांनी लगेच रुग्णवाहिकेला धक्का देत रुग्णालयापर्यंत पोहोचविले. वेळीच पोहोचल्याने रुग्णाचा जीव वाचला.

#solapur #ambulance ##PatientSafety #hospital