गुन्हेगारांनीही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक नवनीत राणा यांना देण्यात आली. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देत देशातील गेल्या सात वर्षातील अनेक घटनांचा अभ्यास केल्यास कौर्याची व्याख्या बदलावी लागेल,असा टोला राऊतांनी लगावला.