नवनीत राणा आणि रवी राणांवर मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.
राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवणं चुकीचं होतं असं सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात म्हंटलं. असा आदेश देताना राणा दांपत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली असं न्यायालयाने नमूद केलं.
राजद्रोहाचं कलम अस्तित्वात असावं की नाही याबाबत मत मतांतरे आहेत. हे कलम ब्रिटीशकालीन आहे आणि ते काढून टाकावं असा देखील मतप्रवाह आहे. त्यामुळे राजद्रोह म्हणजे नेमकं काय असतं आणि तो आपल्यावर कधी दाखल होऊ शकतो हे समजावून घेऊयात.